अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकर हे समुदायासाठी तयार केलेले जगातील पहिले आणि नंबर 1 लोकल सर्च इंजिन आहे.
सर्वसाधारण व्यक्तीला दररोज अनेक अडचणीला सामोरे जावे लागते, त्यातील ७०% अडचणी या सहज सोडवणे शक्य असते, मात्र त्यासाठी त्या समस्या सोडवणाऱ्या वस्तू, सेवा किंवा व्यक्ती कोठे मिळतील हे माहिती नसल्याने त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होत राहते. या अडचणी सहज सोडवता याव्यात यासाठी आम्ही सातारकरांना वेगवान, विनामूल्य, विश्वासार्ह आणि व्यापक माहिती उपलब्ध असणारे प्लॅटफॉर्म उपलब्ध केले आहे.
अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकरचा उद्देश एका सातारकराचे दुसऱ्या सातारकरासोबत मजबूत, विश्वासाचे नाते प्रस्थापित करून त्यांना व्यवसायासाठी किंवा दररोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू आणि सेवा या सातारकरांकडून घेण्यासाठी प्रोत्साहीत आणि अतिशय सोपे प्लॅटफॉर्म उपलब्ध करणे हा आहे.
अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकर मधून आपण राहत असलेल्या किंवा इतर ठिकाणी कोण कोण सातारकर राहत आहे किंवा सातारकर व्यवसाय करत आहे याची माहिती शोधणे अतिशय सोपे व्हावे यासाठी हे प्लॅटफॉर्म तयार केले आहे.
अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकर मधील 'बाय आणि सेल' या अभिनव सेवांचा वापर करता येणार आहे. या सेवांचा वापर करून सातारकर त्यांच्या वस्तू किंवा सेवा सहजरित्या विकू किंवा विकत घेवू शकतील.
अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकरने सातारकरांसाठी 'जॉब्स' सेवा देखील सुरू केली आहे. या सेवा मार्फत उद्योजकांना विश्वासू, परिचयाचे कामगार मिळणे सोपे होणार आहे, तसेच तरुणांना ही नवीन नोकरी मिळवणे अधिक सोपे होईल.
अजिंक्यतारा - कनेक्टींग सातारकरचे मिशन
सातारकरांना वेगवान, विनामूल्य, विश्वासार्ह आणि व्यापक माहिती उपलब्ध करून देणे आणि सातारकर उद्योजकांना इतर सातारकर बरोबर कनेक्ट करणे.